दि अंटी कास्ट क्लब च्या अभ्यास आणि चर्चा सत्रांची नोंदणी सुरू झाली आहे. ०२ ऑक्टोबर च्या आधी नोंदणी करून घ्या.

 




An Initiative for weekly reading & discussions on Ambedkarite Literature 


या उपक्रमाबद्दल काही मूलभूत माहिती :

कोणत्याही चळवळीला जाणून घेण्यासाठी त्या चळवळीच्या साहित्याचा अभ्यास करणे ही सगळ्यात महत्वाची बाब असते. म्हणून The Anti-caste Club (TACC) द्वारे दर रविवारी जातीअंत विषयक साहित्याचे वाचन करून त्यावर चर्चा केली जाते.शाहू-फुले-आंबेडकरांचे साहित्य अभ्यासल्याने समतेच्या या लढ्याला योग्य दिशा देता येईल आणि वैचारिक प्रबोधन करता येईल. बहुजन तरुण-तरुणींपर्यन्त जाती अंताच्या चळवळीचा मूलभूत विचार पोहोचला जावा याउपक्रम सुरू केला गेला आहे.

या उपक्रमाची मूलभूत उद्धिष्टे : 

  • जातीअंतासाठी सहभागी तरुण-तरुणींना वैचारिक साक्षरता प्रदान करणे.
  • जातीअंताच्या चळवळीसाठीचे मूलभूत साहित्य वाचन, चर्चा आणि संवादाच्या रूपाने अभ्यासणे .
  • बहुजन तरुण-तरुणींना संघटित करून जातीअंताच्या चळवळीशी जोडणे.
  • बहुजन तरुण-तरुणींना संवैधानिक मूलभूत हक्क व अधिकार यांच्याविषयी जागरूक करणे.
  • शाहू-फुले-आंबेडकर यांचा वैचारिक वारसा तळागाळात रुजविण्यासाठी वैचारिक वारसदार उभे करणे.
  • चळवळी मधील नवख्या तरुण तरुणींना साहित्य समजण्यास सुलभता व्हावी म्हणून तरुण-तरुणींच्या एका ठराविक गटाला आंबेडकरी मार्गदर्शक नेमून देणे.
  • जातीअंतासाठी अधिकाधिक व्यक्तीना या वैचारिक चळवळीशी जोडून व्यापक लढा उभा करणे.


क्लबचे सदस्य बनण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल :
  • खाली दिलेल्या लिंकवर जाऊन रजीस्ट्रेशन करावे. खालील गुगल फॉर्म मध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहावीत. Registration Link
Registrations opened : 21 September 2022 
Registrations Closing : 02 October  2022 / 11:59 PM
  • गुगल फॉर्म भरलेल्या व्यक्तींना क्लबकडून संपर्क करण्यात येईल. आंबेडकरी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आणि वेळ देऊ शकणाऱ्या लोकांना क्लब द्वारे सदस्य म्हणून निवडले जाईल. 
  • क्लब चे सदस्य बनण्यासाठी कोणतेही सदस्यता शुल्क घेतले जात नाही. तुम्हाला आठवड्यातून दोन तास चर्चेत सहभागी व्हायचे आहे. तसेच क्लब कडून दिलेल्या साहित्याचा अभ्यास करावयाचा आहे. 
  • एकदा तुमची फॉर्म द्वारे निवड झाल्यानंतर तुम्हाला एका मुलाखतीला सामोरे जावे लागेल. तुमची फायनल मुलाखत ऑनलाइन माध्यमाद्वारे घेण्यात येईल. 
  • मुलाखत हा निवडीचा शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या निवडीचा निकाल कळविण्यात येईल.




काही महत्वाच्या नियम व अटी :
  • क्लब मधील सदस्य निवड तसेच वाचनाचे साहित्य निवडणे हे अधिकार हा डेमोक्रॅटिक इंडियन च्या डेमोक्रॅटिक बोर्ड ला असतील . 

  • चर्चेदरम्यान आपले मत शांतपणे आणि संयमाने मांडावे. ओरडून बोलणे, शिवीगाळी करणे ही कृत्ये अस्वीकारहार्य आहे. समोरच्या व्यक्तीचे मत पूर्णपणे आणि संयमाने ऐकून घेऊन आपले प्रतिउत्तर सुद्धा तितक्याच सौम्यपणे देणे अपेक्षित आहे. 

  • ही वाचनसत्रे केवळ मराठी भाषिकांसाठी असून यात सहभागी होणाऱ्या सदस्यांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवली जाणार आहे. 

  • एका पुस्तकाचे वाचन पूर्ण होईपर्यंत नवीन सदस्यांना चर्चेत सहभागी होता येणार नाही. तसेच नोंदणी केलेल्या सदस्यांनी एका पुस्तकाच्या सर्व सत्रात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. एक पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतर नव्या सदस्यांसाठी रजीस्ट्रेशन सुरू केले जाईल.

  • रजिस्ट्रेशन केलेल्या सदस्यांना काही कारणास्तव सत्रात उपस्थित राहणे शक्य नसेल तर क्लब मॅनेजमेंट टीम मधील कोणत्याही एका सदस्याला कळवावे लागेल. तसेच पुढच्या सत्रात येताना मागील आठवड्यामधील वाचन आणि चर्चेचा सारांश अभ्यासून येणे अपेक्षित आहे. 

  • लोकांना आपले विचार मांडण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण मिळावे असा आपला प्रयत्न असल्याने क्लब मधील चर्चांचे ऑडिओ किंवा विडियो रेकॉर्डिंग करण्यास सक्त मनाई आहे. रेकॉर्डिंग करण्याची गरज पडल्यास सर्व सहभागी सदस्यांच्या परवानगीने ते क्लबद्वारेच करण्यात येईल.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि या उपक्रमात जास्तीत बहुजन तरुण तरुणींना सहभागी करण्यास सहकार्य करावे. 



काही अडचण असल्यास संपर्क करावा :

ई मेल : contactdemocraticindian@gmail.com

इनस्टाग्राम : 

डेमोक्रॅटिक इंडियन प्रोफाइल 

The Anticaste Club 


व्हाटसअप्प नंबर ( Only Whatsapp )

अशांत - 8268673266 

चंचल - 8459201093


Comments