दि अंटी कास्ट क्लब च्या अभ्यास आणि चर्चा सत्रांची नोंदणी सुरू झाली आहे. ०२ ऑक्टोबर च्या आधी नोंदणी करून घ्या.
An Initiative for weekly reading & discussions on Ambedkarite Literature या उपक्रमाबद्दल काही मूलभूत माहिती : कोणत्याही चळवळीला जाणून घेण्यासाठी त्या चळवळीच्या साहित्याचा अभ्यास करणे ही सगळ्यात महत्वाची बाब असते. म्हणून The Anti-caste Club (TACC) द्वारे दर रविवारी जातीअंत विषयक साहित्याचे वाचन करून त्यावर चर्चा केली जाते.शाहू-फुले-आंबेडकरांचे साहित्य अभ्यासल्याने समतेच्या या लढ्याला योग्य दिशा देता येईल आणि वैचारिक प्रबोधन करता येईल. बहुजन तरुण-तरुणींपर्यन्त जाती अंताच्या चळवळीचा मूलभूत विचार पोहोचला जावा याउपक्रम सुरू केला गेला आहे. या उपक्रमाची मूलभूत उद्धिष्टे : जातीअंतासाठी सहभागी तरुण-तरुणींना वैचारिक साक्षरता प्रदान करणे. जातीअंताच्या चळवळीसाठीचे मूलभूत साहित्य वाचन, चर्चा आणि संवादाच्या रूपाने अभ्यासणे . बहुजन तरुण-तरुणींना संघटित करून जातीअंताच्या चळवळीशी जोडणे. बहुजन तरुण-तरुणींना संवैधानिक मूलभूत हक्क व अधिकार यांच्याविषयी जागरूक करणे. शाहू-फुले-आंबेडकर यांचा वैचारिक वारसा तळागाळात रुजविण्यासाठी वैचारिक वारसदार उभे करणे. चळवळी मधील नवख्या तरुण तरु...